School Index no 04120100084

About Primary Section

लोकमान्य शिक्षण संस्था, अंबरनाथ संचलित: 'बालभवन' प्राथमिक शाळा अमृत महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल (१९५२ - २०२७) १. *शाळेचा उगम आणि संस्थापक* 'बालभवन' प्राथमिक शाळेची मुहूर्तमेढ ७ जून १९५२ रोजी कै. नारायण धोंडदेव (नाना) गोखले यांनी रोवली. रत्नागिरी जिल्ह्यातील 'केळये' या छोट्या गावातून आलेल्या नाना गोखले यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर केवळ ५ विद्यार्थ्यांसह अंबरनाथमधील वडवली विभागात 'जानकी सदन' मधील एका छोट्या खोलीत त्यांनी या ज्ञानयज्ञाची सुरुवात केली. २. प्रगतीचे टप्पे आणि विस्तार * सुरुवातीचा काळ: अवघ्या १५ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास, पुढे 'बर्वे वॉच कंपनी' जवळील जागेत स्थलांतरित झाला. नाना गुरुजींच्या शिस्तीमुळे आणि अध्यापनामुळे शाळेचा नावलौकिक वाढला. शाळेचा विद्यार्थी इयत्ता ४ थीच्या स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे, हा शाळेच्या गुणवत्तेचा मोठा पुरावा होता. * *नेतृत्व बदल* : १९६० च्या सुमारास प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाना गुरुजींनी शाळेची धुरा त्यांचे पुतणे कै. श्री. यशवंत जनार्दन गोखले यांच्याकडे सोपवली. यशवंत गुरुजींनी ही जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि यशस्वीपणे आयुष्यभर सांभाळली. ३. पूर्व-प्राथमिक विभागाची स्थापना १९८५ च्या दरम्यान शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार शाळेत शिशु व बालवर्गाची सोय करणे आवश्यक झाले. जागेची चणचण असतानाही यशवंत गुरुजींच्या पत्नी कै. सौ. वसुधा गोखले यांनी आपल्या राहत्या घरातच पूर्व-प्राथमिक विभाग सुरू केला. त्यांनी स्वतः बालवाडीचा कोर्स पूर्ण करून या विभागाची जबाबदारी सक्षमपणे पेलली. ४. *संस्थेचे संलग्नीकरण आणि स्थलांतर* वाढती विद्यार्थी संख्या आणि जागेचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी, अंबरनाथमधील नामवंत संस्था 'दि एज्युकेशन सोसायटी' च्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी (श्री. संतोषराव आदक, कै. श्रीकांतराव देशपांडे, कै. अरविंद पोळ, कै. अण्णा कोपरकर इ.) मोलाचे सहकार्य केले. * १९९९ मध्ये शाळा 'महात्मा गांधी विद्यालय' (अंबरनाथ पश्चिम) च्या प्रशस्त आवारात स्थलांतरित झाली. * यामुळे शाळेला हक्काची जागा मिळाली आणि सर्व वर्ग (शिशुवाटीका ते इ. ४ थी) एकाच छताखाली भरू लागले. ५. *प्रशासकीय मंडळ आणि शिक्षिकांचा वारसा* शाळेच्या कायदेशीर नोंदणीसाठी लोकमान्य शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. यामध्ये गोखले परिवारातील सदस्यांसह इतर शिक्षणप्रेमींचा समावेश होता. सौ. नूलकर, सौ. जोशी, सौ. सोनजे यांसारख्या अनेक ज्येष्ठ शिक्षिकांनी शाळेचा शैक्षणिक पाया भक्कम केला. ६. सद्यस्थिती (एक दृष्टीक्षेप) आज बालभवन शाळा ही अंबरनाथमधील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते: * विद्यार्थी संख्या: पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक विभागात मिळून सुमारे ७५० ते ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. * तुकड्या: प्राथमिक विभागाच्या ८ तुकड्या (अंशतः अनुदानित) आणि पूर्व-प्राथमिक विभागाच्या ८ तुकड्या (विना-अनुदानित) कार्यरत आहेत. * मुख्याध्यापिका: सध्या सौ. रेश्मा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची प्रगती सुरू आहे. ७. *ध्येय* : अमृत महोत्सवी वर्ष २०२७ नाना गोखले गुरुजींनी लावलेल्या या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. २०२७ साली ही संस्था आपल्या स्थापनेची ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण करत आहे. दर्जेदार शिक्षण आणि संस्कारांची परंपरा जपत ही शाळा भविष्यातील सुजाण नागरिक घडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक कृतिशील व सृजनात्मक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले जातात. उपक्रमांची मांदियाळी – काही वानगी दाखल विज्ञान जत्रा, थीम बेस स्नेहसंमेलन, खेळ सावल्यांचा, जाहिरात एक कला, इकोफ्रेंडली स्पर्धा, बोरन्हाणं एक शिशु संस्कार, थाळी नृत्य, बाल महोत्सव, निवासी शिबीर, बोलक्या बाहुल्या, स्वर संध्या, बिजांकुर, दीपोत्सव, चला जाऊ या पुस्तकांच्या दुनियेत, यज्ञ एक संस्कार, मुक्तांगण, जल्लोष, क्षेत्रभेट, बाहुला-बाहुली लग्न इत्यादी. सामाजिक बांधिलकी म्हणून ‘विद्यार्थी दत्तक योजना' राबविली जाते.

सन २०१३-१४ शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष – संस्थेच्या सर्व मराठी माध्यमाच्या शाळेतील ई लर्निंग सुरु करणारी डोंबिवलीतील ही पहिली प्राथमिक शाळा.

सन २०१५ - १६ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळाकडून 'आदर्श शाळा' महापौर पुरस्काराने सन्मानित तसेच शिक्षक व मुख्याध्यापक यांना अनेक संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, या शाळेत घडले. डोंबिवलीतील अनेक देणगीदार, जाहिरातदार, आश्रयदाते, यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विकासासाठी, निस्वार्थपणे अथक परिश्रम घेतले. असंख्य ज्ञात-अज्ञात सदस्य, शाळेचे अगणित हितचिंतक यांच्या ऋणातच शाळा राहील.

प्राथमिक विभाग बद्दल

पूर्वप्राथमिक प्राथमिक विभागातील विद्यार्थी हे ३ ते ९ या वयोगटातील असतात. हा वयोगट अतिशय संस्कारक्षम असल्याने पालकही तेवढेच संवेदनशील असतात सुशिक्षित व सुसंस्कारित पालकांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जाही उंचावला गेला व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मध्ये आतापर्यंत ६३ विद्यार्थी, एम. टी. एस./ एम. पी. एस. पी. मध्ये ४१ विद्यार्थी चमकले. BDS, IPM सारख्या परिक्षांनाही हे विद्यार्थी बसतात व आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवतात. मातीच्या गोळ्याला जसा आकार द्यावा त्याप्रमाणे तो घडतो म्हणूनच गुणवत्तावाढीबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्याचा शाळेने नेहमीच प्रयत्न केला आहे.

नाट्य व नृत्य विष्कारातून शाळेला सन्मान मिळवून देणारा क्षण म्हणजे अवर्णनीय ! काही नाटकांची सफर तर ओरिसा पर्यंत जाऊन पोहोचली. राज्य, जिल्हा, तालुका व आंतरशालेय सर्व पातळ्यांवर शाळेने विविध पारितोषिके मिळविली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक कृतिशील व सृजनात्मक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले जातात. उपक्रमांची मांदियाळी – काही वानगी दाखल! विज्ञान जत्रा, थीम बेस स्नेहसंमेलन, खेळ सावल्यांचा, जाहिरात एक कला, इकोफ्रेंडली स्पर्धा, बोरन्हाणं एक शिशु संस्कार, थाळी नृत्य, बाल महोत्सव, निवासी शिबीर, बोलक्या बाहुल्या, स्वर संध्या, बिजांकुर, दीपोत्सव, चला जाऊ या पुस्तकांच्या दुनियेत, यज्ञ एक संस्कार, मुक्तांगण, जल्लोष, क्षेत्रभेट, बाहुला-बाहुली लग्न इत्यादी. सामाजिक बांधिलकी म्हणून ‘विद्यार्थी दत्तक योजना' राबविली जाते.

सन २०१३-१४ शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष – संस्थेच्या सर्व मराठी माध्यमाच्या शाळेतील ई लर्निंग सुरु करणारी डोंबिवलीतील ही पहिली प्राथमिक शाळा.

सन २०१५ - १६ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळाकडून 'आदर्श शाळा' महापौर पुरस्काराने सन्मानित तसेच शिक्षक व मुख्याध्यापक यांना अनेक संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, या शाळेत घडले. डोंबिवलीतील अनेक देणगीदार, जाहिरातदार, आश्रयदाते, यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विकासासाठी, निस्वार्थपणे अथक परिश्रम घेतले. असंख्य ज्ञात-अज्ञात सदस्य, शाळेचे अगणित हितचिंतक यांच्या ऋणातच शाळा राहील.


Primary School Committee

प्राथमिक शालेय समिती

Sr.No. अनु. क्र Name नाव Designation पदनाम
1 Mr. Shailesh Shankar Raikar मा. श्री शैलेश शंकर रायकर President अध्यक्ष
2 Mr. Pankaj Vasudev Bhalerao मा. श्री पंकज वासुदेव भालेराव Member सदस्य
3 Mr. Dilip Anantrao Kanse मा. श्री दिलीप अनंतराव कणसे Member सदस्य
4 Mrs. Deepali Dilip Akhere सौ दिपाली दिलीप आखेरे Member सदस्य
5 Mr. Balasaheb Gaikwad मा.श्री बाळासाहेब गायकवाड Invitee निमंत्रित
6 Mrs. Pournima Phadnis मा. सौ पौर्णिमा फडणीस Invitee निमंत्रित
7 Mrs. Swati Shetye मा.सौ स्वाती शेटये Invitee निमंत्रित

Teaching Staff

शिक्षक वृंद

Pawar Reshma Vinayak
सौ. पावसकर समता जगन्नाथ

Headmistress

मुख्याध्यापिका

Designation

Headmistress

मुख्याध्यापिका

Qualification:
शिक्षण:

H. S. C. D. Ed. B. A.

एम.ए. बी.एड, डी.एड.डी.एस.एम.

Tandekar Kunda Lakshman
सौ. गोखले वनिता नरेंद्र

Assistant Teacher

सहा. शिक्षिका

Designation:

Assistant Teacher

सहा. शिक्षिका

Qualification:
शिक्षण:

HSC Ded BA

बी. ए. डी. एड.

No image
Sonawane Yogita Ashok
सौ. पंदेरे अरुणा अनिल

Assistant Teacher

सहा. शिक्षिका

Designation:

Assistant Teacher

सहा. शिक्षिका

Qualification:
शिक्षण:

B.A, D.Ed, D.S.M

बी. ए. डी. एड.

No image
Bhagat Shubhangi Amit
सौ. टिपणीस अश्विनी प्रताप

Assistant Teacher

सहा. शिक्षिका

Designation:

Assistant Teacher

सहा. शिक्षिका

Qualification:
शिक्षण:

HSC Ded BA

बी. ए. डी. एड.

No image
Chavan Madhura Niteen
सौ. टिपणीस अश्विनी प्रताप

Assistant Teacher

सहा. शिक्षिका

Designation:

Assistant Teacher

सहा. शिक्षिका

Qualification:
शिक्षण:

B. A. D. Ed

बी. ए. डी. एड.

No image
Borse Jayshree Pankaj
सौ. साळुंखे जान्हवी अनिल

Assistant teacher

सहा. शिक्षिका

Designation:

Assistant teacher

सहा. शिक्षिका

Qualification:
शिक्षण:

M.A.D.ed

बी. ए. डी. एड.

No image
Suvarna deepak karanjule
सौ. जाधव दिपाली प्रकाश

Assistant teacher

सहा. शिक्षिका

Designation:

Asst. Teacher

सहा. शिक्षिका

Qualification:
शिक्षण:

BA,DED,BED,DSM

बी. ए. डी. एड.

No image
Chimate alka shashikant
सौ. काणे प्रतिमा दीपक

Assistant teacher

सहा. शिक्षिका

Designation:

Music Teacher

संगीत शिक्षिका

Qualification:
शिक्षण:

M.A.D.ed

संगीत विशारद

No image
Gode Ramesh dattu
सौ. बेंद्रे माया अजित

Assistant teacher

सहा. शिक्षिका

Designation:

Asst. Teacher

सहा. शिक्षिका

Qualification:
शिक्षण:

M.Com.D.ed

बी. ए. डी. एड.