दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ
दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ या संस्थेने सन २०२६ साली ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. अशा नामांकित संस्थेला जेव्हा ९० वर्षे पूर्ण होतात तेव्हा ती घटना केवळ संस्थेसाठीच नाही तर संपूर्ण शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. कारण एखाद्या संस्थेचा ९ दशकांचा प्रवास म्हणजे या दीर्घ कालखंडातील समाजाच्या पर्यायाने शहराच्या जडणघडणीचा चालता बोलता ज्वलंत इतिहास असतो. तसेच तो वर्तमानातील ध्यास तर भविष्यातला विश्वासही असतो. गेली ९० वर्ष दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ ही संस्था ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. आपल्यापाशी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने घडवत आणि संपन्न करीत, ही ज्ञान सरिता अखंड वाहत आहे. तिचे पात्र दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष अधिक विस्तीर्ण आणि सखोल होत आहे. या शुभंकर प्रवाहाचा उगम अंबरनाथ नगरीत झाला ते वर्ष होते - सन १९३६ आणि ज्यांच्या द्रष्टेपणामुळे ही ज्ञानगंगा वाहती झाली; ती व्यक्ती होती ऋषितुल्य कैलासवासी पुरुषोत्तम वासुदेव तथा भाऊसाहेब परांजपे! सन १९२२ मध्ये विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले भाऊसाहेब नोकरीनिमित्त अंबरनाथ शहरात वास्तव्यास आले. इथल्या धरमजी मोरारजी केमिकल कंपनीत ते मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्या काळात कोहोजगाव- खूंटवली या परिसरात लोकल बोर्डाची इ. ४ थी पर्यंत एकच शाळा होती. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी कल्याणला जावं लागे. त्याकाळी शाळकरी मुलांसाठी ते सोपे नव्हतं. कारण अंबरनाथला तेव्हा रेल्वेचा प्लॅटफॉर्मही नव्हता. शिडीच्या सहाय्याने लोकलचा डबा चढावे/ उतरावे लागत असे. रोजची अशी कसरत पार पाडत शिक्षणासाठी कल्याणला जायचं किंवा शिक्षण अर्धवट सोडायचं एवढा एकमेव पर्याय! शिक्षणाबद्दल मनस्वी आस्था असलेल्या भाऊसाहेबांना ही परिस्थिती अस्वस्थ करीत होती. परंतु त्यांची ही तळमळ केवळ भावनिक नव्हे तर चिंतनशील आणि कृतीशील होती. ही परिस्थिती पालटण्यासाठी काय करता येईल? याचं चिंतन त्यांनी केलं आणि याचच दृश्य फलित म्हणजे - दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ. सन १९३६ मध्ये भाऊसाहेबांनी आपल्या समविचारी मित्रांसमवेत संस्थेची स्थापना केली आणि अंबरनाथच्या शैक्षणिक प्रगतीचा एक नवा अध्याय सुरु झाला. संस्थेच्या माध्यमातून सन १९३६ साली संस्थापक भाऊसाहेब परांजपे, अध्यक्ष डॉ. बी. जे. छाया आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या पुढाकाराने, अंबरनाथ शहरात २२ विद्यार्थ्यांच्या सहवासातून पहिले माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. डी.एम.सी. कंपनीने भाऊसाहेबांना दिलेल्या प्रशस्त बंगल्यात ही शाळा भरु लागली. आणि शाळेचे नाव ठरले - दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे, न्यू इंग्लिश स्कूल. शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते श्री. नि. अ. कोरडे. सन १९४६ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी अंबरनाथमध्ये आले होते. म. गांधींजींचा प्रेरक सहवास शाळेला लाभला. त्या पवित्र क्षणांची स्मृती जपली जावी म्हणून पुढे न्यू इंग्लिश स्कूल ऐवजी महात्मा गांधी विद्यालय असे नामकरण करण्यात आले. ध्येयनिष्ठ संस्थाचालक, शिस्तप्रिय मुख्याध्यापक, ज्ञानवंत-गुणवंत शिक्षक, जागृत पालक आणि जिज्ञासू विद्यार्थी यामुळे महात्मा गांधी विद्यालय लवकरच नावारूपाला आले ते आजतागायत! दहावीनंतर अंबरनाथ शहरातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गरज म्हणून सन १९७५ - ७६ साली इयत्ता ११ वी चे वर्ग सुरू करण्यात आले. ज्याद्वारे कनिष्ठ महाविद्यालयाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून विद्यार्थी ज्ञान संपादन करु लागले. तत्कालीन परिस्थितीत झपाट्याने होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे कुशल कामगारांच्या निर्मितीची गरज म्हणून सन १९८६ साली दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक (टेक्निकल) विषयाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला फिटर आणि वायरमन हे कोर्सेस शिकविण्यात येत होते. कालांतराने काळाची गरज म्हणून १९८९ पासुन Elements of Electrical and Electronic Technology या विषयाचे ज्ञान विद्यार्थी मिळवू लागले. सन २०१२ पासून Electrical Technology हा विषय टेक्निकल विषय म्हणून शिकविला जात आहे. टेक्निकल विषय घेऊन आतापर्यंत शाळेचे हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च पदस्थ म्हणून काम करीत आहेत. ही देखील शाळेच्या दृष्टीने अभिमानाची बाब होय. हे विशेष!
आमचे संस्थापक
Founder
दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे संस्थापक :-- कै. पुरुषोत्तम वासुदेव ऊर्फ भाऊसाहेब परांजपे "समाजाय इदम ! न मम!!" या तत्वाने आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी अर्पण करणारे, थोर स्वातंत्र्य सैनिक, अंबरनाथचे पहिले आमदार, द्रष्टे नेते, सामाजिक कार्यकर्ते, कामगारांचे कैवारी आणि अंबरनाथ शहराच्या सामाजिक, दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथच्या माध्यमातून शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तम वासुदेव ऊर्फ भाऊसाहेब परांजपे. प्रथमतः त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!! भाऊसाहेब परांजपे यांचा जन्म १३ मार्च १८९५ या दिवशी सातारा येथे झाला. परांजपे घराणे मूळचे कोकणातील अडीवऱ्याचे. भाऊसाहेब कोकणातून सासवड जवळील परिचे येथे आले. त्यामुळे परिचेकर परांजपे म्हणूनही त्यांना ओळखत असत. भाऊसाहेबांचे लहानपण परीचे आणि सातारा येथे गेले. १९२२ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. अंबरनाथ येथील धरमसी मोरारजी केमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून भाऊसाहेब नोकरीला लागले. त्यांच्या कामाची दखल घेऊन कंपनीकडून त्यांना काही वर्षांसाठी इंग्लंडला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. तिथून परतल्यानंतर कंपनीच्या मुख्य कार्यालयात त्यांनी काही काळ कंपनी सचिव म्हणूनही काम केले. १९५७ मध्ये अंबरनाथ येथून व्यवस्थापक पदावरून ते निवृत्त झाले. १९४२ च्या 'चले जाव' चळवळीत ते सहभागी झाले होते. त्यांनी दोनदा कारावासही भोगला. भाऊसाहेब परांजपे यांनी मुंबई प्रांताचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्या अर्थाने भाऊसाहेब परांजपे हे खऱ्या अर्थाने अंबरनाथचे पहिले आमदार होते.अंबरनाथ येथे अनेक लहान मोठ्या कंपन्यामध्ये नोकरीसाठी अंबरनाथ शहराच्या बाहेरून हजारो कामगार स्थायिक झाले होते. त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी भाऊसाहेब परांजपे यांनी सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा करून अंबरनाथ शहरातील पूर्वेकडे बाजार भावाने जमीन विकत घेतली. या जमिनीचे व्यवस्थित नियोजन भाऊसाहेब परांजपे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने केले. भूभागाचे नियोजन, इतक्या मोठ्या वसाहतीसाठी लागणाऱ्या अन्य सोयी सुविधांसाठी भूभागाच्या व्यतिरिक्त जमीन आरक्षित करण्यात आली. रस्ते, विविध कार्यालयांसाठी, खेळाच्या मैदानासाठी, मनोरंजन केंद्रासाठी अशी विविध प्रयोजनांसाठी आरक्षण करण्यात आले. ६३० पेक्षा अधिक भूभाग असलेली महाराष्ट्रातील किंबहुना आशिया खंडातील सर्वात मोठी आणि जुनी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. हजारो कुटुंबांच्या निवासाची सोय झाली. निवासासह या कामगार, कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचीही सोय व्हावी, यासाठी सन १९३६ मध्ये दि एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना करून महात्मा गांधी विद्यालय सुरू केले. या शाळेसाठी साठी त्यांना डॉ. भुजंगीलाल गौरीशंकर छाया अर्थात डॉ.बी. जी छाया यांचीही मोलाची मदत झाली. भाऊसाहेब परांजपे हे धरमसी मोरारजी केमिकल कंपनीत नोकरी करीत तर डॉ. भुजंगीलाल गौरीशंकर उर्फ बी. जी. छाया हे प्रसिद्ध विमको कंपनीमध्ये मुख्य वैधकीय अधिकारी म्हणून नोकरीला होते. त्या काळात महात्मा गांधी विद्यालय ही शाळा खाजगी जागेतील खोल्यांमध्ये भरायची. दि एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यलयांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर यशस्वी रीत्या जीवन जगत आहेत. भाऊसाहेब परांजपे यांनी ठाणे जिल्हा विकास मंडळ, केंद्र सरकारने अन्नधान्य समस्यांचा विचार करण्यासाठी नेमलेली समिती, मुंबई प्रांताची जंगल विभाग विकास योजना समिती यांवरही काम केले. भाऊसाहेब परांजपे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या अंबरनाथ ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. भाऊसाहेब परांजपे यांनी 'सूर्योदय' हे साप्ताहिकही सुमारे चार वर्षे चालविले. त्याकाळात असलेल्या मुंबई प्रांताचे आमदार असल्याने भाऊसाहेब परांजपे यांची राजकीय वर्तुळात उठबस होती. १९५० मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद अंबरनाथ येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना काही वेळ भाऊसाहेबांच्या घरी थांबले होते. पं जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आदी मान्यवरही अंबरनाथला भाऊसाहेब परांजपे यांच्या घरी येऊन गेले होते. भाऊसाहेब परांजपे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त अंबरनाथकरांनी भाऊसाहेबांना दिलेली मानधनाची थैली त्याच समारंभात त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या दि एज्युकेशन सोसायटीला दिली होती. प्राचीन शिवमंदिराजवळ भाऊसाहेब परांजपे यांना धरमसी मोरारजी केमिकल कंपनीने निवासासाठी जागा घेऊन दिली होती. आजही त्या विभागाला परांजपे चाळ असे संबोधले जाते. भाऊसाहेबांनी अनेक कामगारांना अतिशय माफक दरात घरे घेऊन दिली होते.भाऊसाहेब परांजपे यांनी कधीही स्वार्थ जोपासला नाही.आयुष्याच्या अखेरपर्यंत भाऊसाहेब परांजपे कार्यरत होते. भाऊसाहेब परांजपे यांनी सूर्योदय सोसायटीची स्थापना केली. या सूर्योदय सोसायटीने, भाऊसाहेबांनीच स्थापन केलेल्या दि एज्युकेशन सोसायटीच्या कानसई येथे सुरू करण्यात आलेल्या शाळेला भाऊसाहेब परांजपे यांचे नाव देण्यासाठी भरीव आर्थिक देणगी दिल्यावर त्या शाळेला "भाऊसाहेब परांजपे विद्यालय" असे नांव देण्यात आले आहे. सूर्योदय सोसायटीचे संस्थापक या नात्याने साई विभागात असलेल्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर भाऊसाहेब परांजपे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. अंबरनाथ शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या भाऊसाहेब परांजपे यांचे 30 जून 1981 रोजी निधन झाले. भाऊसाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!!
महात्मा गांधी विद्यालय
शिक्षणाबद्दल मनस्वी आस्था असलेल्या भाऊसाहेब परांजपे यांनी सन १९३६ मध्ये आपल्या समविचारी मित्रांसमवेत दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ या संस्थेची स्थापना केली आणि अंबरनाथच्या शैक्षणिक प्रगतीचा एक नवा अध्याय सुरु झाला. संस्थेच्या माध्यमातून सन १९३६ साली संस्थापक भाऊसाहेब परांजपे, अध्यक्ष डॉ. बी. जे. छाया आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या पुढाकाराने, अंबरनाथ शहरात २२ विद्यार्थ्यांच्या सहवासातून पहिले माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. डी.एम.सी. कंपनीने भाऊसाहेबांना दिलेल्या प्रशस्त बंगल्यात ही शाळा भरु लागली. आणि शाळेचे नाव ठरले - दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे, न्यू इंग्लिश स्कूल. शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते श्री. नि. अ. कोरडे. सन १९४६ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी अंबरनाथमध्ये आले होते. म. गांधींजींचा प्रेरक सहवास शाळेला लाभला. त्या पवित्र क्षणांची स्मृती जपली जावी म्हणून पुढे न्यू इंग्लिश स्कूल ऐवजी महात्मा गांधी विद्यालय असे नामकरण करण्यात आले. ध्येयनिष्ठ संस्थाचालक, शिस्तप्रिय मुख्याध्यापक, ज्ञानवंत-गुणवंत शिक्षक, जागृत पालक आणि जिज्ञासू विद्यार्थी यामुळे महात्मा गांधी विद्यालय लवकरच नावारूपाला आले ते आजतागायत!
Our Vision
उद्दिष्टे
Data Pending
Our Values
मूल्य
Data Pending
Our Mission
ध्येय
Data Pending
Future Plan
भविष्यकालीन योजना
- Smart classrooms with digital boards, projectors, and computers
- Use of advanced digital learning tools
- Well-equipped library for reading and research
- Science laboratories and activity rooms for practical learning
- Large sports ground with facilities for football, cricket, volleyball, and athletics
- Emphasis on skill-based and practical learning
- Encourage creativity, critical thinking, and innovation
- Focus on joyful and engaging learning methods
- Promote multilingual education
- Align teaching practices with modern education systems
- Follow principles of holistic and multidisciplinary education
- Implement modern teaching methodologies
- Promote experiential and application-based learning
- Develop the school as a model institution under NEP 2020
- Encourage participation in sports, arts, music, and cultural programs
- Provide opportunities for competitions and talent development
- Focus on teamwork, leadership, and confidence building
- Support overall personality development of students
- Promote values like honesty, respect, responsibility, and teamwork
- Conduct tree plantation drives and cleanliness initiatives
- Encourage eco-friendly practices and environmental awareness
- Organize regular training programs to enhance teacher quality
Message
संदेश
डॉ. अजित गोडबोले (अध्यक्ष)
सप्रेम नमस्कार महात्मा गांधी विद्यालयाच्या संकेतस्थळावर आपलं स्वागत आहे. ९० वर्षांचा टप्पा पार करत असताना आपली शाळा आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याशी या संकेतस्थळाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी अंबरनाथकरांना आपली शाळा परिचित आहे.शिशुवाटिका ते बारावी पर्यंतचे अडीच हजार विद्यार्थी आपल्या शाळेत शिक्षण घेत आहेत.आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आपण कटिबद्ध आहोत. संगीत,गणित या विषयांचे कक्ष,विज्ञान प्रयोगशाळा,क्रीडांगण या सगळ्यांनी आपली शाळा परिपूर्ण आहे.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सतत नवनवीन उपक्रम आपण राबवत असतो. आपल्या शाळेतील विविध उपक्रम आणि नवनवीन संकल्पना या संकेतस्थळावरून आपल्या पर्यंत पोहोचणार आहेत. परंपरागत शिक्षण पद्धतीवर भर देत असताना, नाविन्याचा ध्यास घेऊन या संकेतस्थळाचे नियोजन करणारे शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष भणगे आणि सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. डॉ. अजित गोडबोले अध्यक्ष दि एज्युकेशन सोसायटी,अंबरनाथ.
श्री.संतोष भणगे ( मुख्याध्यापक)
"प्रत्येक क्षण घे वेचूनि यत्नांत जा नित दंगुनि
घे जिद्दीने यश खेचूनि,
होई सार्थक जीवनी!"
या प्रेरक उक्तीप्रमाणे उत्तम, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणारी ठाणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य व नामांकित शैक्षणिक संस्था म्हणजेच दि एज्युकेशन सोसायटी संचालित 'महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, अंबरनाथ' ही आमची शाळा!
गेली नऊ दशके 'प्रज्वालितो ज्ञानमय: प्रदीप:'या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून भविष्याचा वेध घेत आहे.
'ज्ञान-विज्ञानासंगे उंच भरारी घ्यावी
काळाच्या पाऊलवाटेवर प्रकाशवाट शोधावी'
याच वृत्तीने आम्हांला अभिमान वाटतो की, अंबरनाथमधील सर्वांत जुनी मराठी शाळा असूनही आम्ही काळाची पावले ओळखून 'तंत्रज्ञानाचा' सार्थ स्वीकार केला आहे. आज आमची शाळा ही केवळ भिंतींची इमारत नसून ती भविष्यातील ध्येयवेड्या तरुणाईला घडविणारी प्रयोगशाळा आहे.
नवे शैक्षणिक धोरण आणि आमचा दृष्टिकोन:
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अनुषंगाने आम्ही केवळ माहिती देणारे शिक्षण न देता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देत आहोत.
पंचपदीचा वापर: शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत आम्ही 'अदिती', 'बोध', 'अभ्यास', 'प्रयोग' आणि 'प्रसार' या पंचपदींचा वापर करून विद्यार्थ्यांमधील आकलनशक्ती वाढवत आहोत.
पंचकोश विकास: अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा 'पंचकोशांच्या' विकासातून केवळ पदवीधर नव्हे, तर एक 'उत्तम माणूस' घडविणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे.
परंपरा:
आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. खेळाचे मैदान असो वा विज्ञानाची प्रयोगशाळा, साहित्य क्षेत्र असो वा तंत्रज्ञान; आमचे विद्यार्थी सर्वत्र अग्रेसर आहेत.
ई- लर्निंगसाठी दृकश्राव्य कक्ष, स्मार्ट बोर्ड आणि आता डिजिटल युगातील आमचे महत्त्वाचे पाऊल म्हणजेच आमची ही वेबसाईट!
विद्यालयाच्या अभिमानास्पद अशा ९० वर्षाच्या वाटचालीत शाळेचे खरे चैतन्य असलेले आमचे विद्यार्थी, सजग पालक, समर्पित शिक्षक - पदाधिकारी, सक्षम माजी विद्यार्थी संघ, देणगीदार, हितचिंतक आणि आधारवड असणारी आमची संस्था यांचे सहकार्य मोलाचे आहे.
ह्या वेबसाईटच्या माध्यमातून यांमध्ये संवादाचे एक बळकट माध्यम निर्माण होईल आणि हा ज्ञानयज्ञ यशस्वीरित्या आपल्या सहकार्याने अखंड सुरू राहील याची खात्री वाटते.
चला, आपण सर्व मिळून समृद्ध, सुसंस्कृत, कलाप्रेमी आणि तंत्रस्नेही पिढी घडवूया!
धन्यवाद!
पला नम्र,
मुख्याध्यापक,
श्री.संतोष भणगे
महात्मा गांधी विद्यालय,अंबरनाथ.
TESA Management Committee
व्यवस्थापन समिती
Dr. Ajit Anil Godbole
डॉ. अजित अनिल गोडबोले
President
अध्यक्ष
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Ashok Kulkarni
श्री. अशोक कुलकर्णी
Vice President
उपाध्यक्ष
Data Awaiting
Data Awaiting
Sudheendra Shurpali
सुधींद्र शुर्पाळी
Secretary
सचिव
Data Awaiting.
Data Awaiting.
Mr. Dilip Sathe
श्री. दिलीप साठे
Joint Secretary
सह सचिव
Data Awaiting
Data Awaiting
Pankaj Bhalerao
पंकज भालेराव
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Dipak Chavan
श्री. दीपक चव्हाण
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Gopal Damle
गोपाल दमले
Member
सदस्य
Data Awaiting.
Data Awaiting.
Mr. Prasad Joshi
श्री. प्रसाद जोशी
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Dilip Kanase
दिलीप कानसे
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Mrs. Varsha Prabhudesai
श्रीमती वर्षा प्रभुदेसाई
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Shailesh Raikar
श्री शैलेश रायकर
Member
सदस्य
Data Awaiting.
Data Awaiting.
Trustees
विश्वस्त
Mr. Bhagwan Chakradev
श्री भगवान चक्रदेव
Cheif Trustee
मुख्य विश्वस्त
Data Awaiting
Data Awaiting
Mr.Balkrushna Kamble
श्री. बाळकृष्ण कांबळे
Trustee
विश्वस्त
Data Awaiting.
Data Awaiting.
Data Awaiting.
Data Awaiting.
Mrs. Dipali Aakhare
श्रीमती दीपाली आखरे
Trustee
विश्वस्त
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Manik Patil
श्री. मणिक पाटील
Trustee
विश्वस्त
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Abhay Puntambekar
श्री अभय पंटांबेकर
Trustee
विश्वस्त
Data Awaiting
Data Awaiting