|| या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।।

महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ (प)

शिक्षणाबद्दल मनस्वी आस्था असलेल्या भाऊसाहेब परांजपे यांनी सन १९३६ मध्ये आपल्या समविचारी मित्रांसमवेत दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ या संस्थेची स्थापना केली आणि अंबरनाथच्या शैक्षणिक प्रगतीचा एक नवा अध्याय सुरु झाला. संस्थेच्या माध्यमातून सन १९३६ साली संस्थापक भाऊसाहेब परांजपे, अध्यक्ष डॉ. बी. जे. छाया आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या पुढाकाराने, अंबरनाथ शहरात २२ विद्यार्थ्यांच्या सहवासातून पहिले माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. डी.एम.सी. कंपनीने भाऊसाहेबांना दिलेल्या प्रशस्त बंगल्यात ही शाळा भरु लागली. आणि शाळेचे नाव ठरले - दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे, न्यू इंग्लिश स्कूल. शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते श्री. नि. अ. कोरडे. सन १९४६ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी अंबरनाथमध्ये आले होते. म. गांधींजींचा प्रेरक सहवास शाळेला लाभला. त्या पवित्र क्षणांची स्मृती जपली जावी म्हणून पुढे न्यू इंग्लिश स्कूल ऐवजी महात्मा गांधी विद्यालय असे नामकरण करण्यात आले. ध्येयनिष्ठ संस्थाचालक, शिस्तप्रिय मुख्याध्यापक, ज्ञानवंत-गुणवंत शिक्षक, जागृत पालक आणि जिज्ञासू विद्यार्थी यामुळे महात्मा गांधी विद्यालय लवकरच नावारूपाला आले ते आजतागायत!


Gallery

गॅलरी


Pride Of S.V.Joshi

आमचे मानबिंदू


Saniv Barve

श्री. संजयजी बर्वे ( माजी पोलीस आयुक्त - मुंबई )

महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ शाळेचे माजी विद्यार्थी (इ. 10 वी -1975 बॅच ) संजय बर्वे हे महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ येथील १९७५ च्या एस.एस.सी. (SSC) बॅचचे माजी विद्यार्थी असून, ते १९८७ च्या बॅचचे भारतीय पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. श्री. बर्वे यांनी १८ सप्टेंबर २०१८ पासून महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) महासंचालक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) हे पद भूषवले असून, राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे. ते महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालकही राहिले आहेत. अब्दुल करीम तेलगी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाचा ते एक भाग होते. २००६ साली त्यांना 'राष्ट्रपतींचे पोलीस पदक' देऊन सन्मानित करण्यात आले.

more
Mithilesh

Prasad kothari

Prasad kothari is Data Scientist & AI leader. Prasad kothari is Data science & AI leader who has built teams for Big4 such as PwC & few unicorns such as Fractal & Axtria. He was one of the first AI scientist to propose COVID medicine through AI and has been featured in Forbes. He has written books that are in syllabus of MS - Statistics & Biostatistics. He gives lectures in few universities including Boston. His work has been appreciated in academia & the industry for cutting edge innovation. He is on advisory board of few initiatives such as Ramanujan Machine, Blockchain for Healthcare etc.

more